शरीफ शेख
रावेर , दि. ०७ :- रावेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या व्हा चेअरमन पदी तुषार मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हा चेअरमन डी एन महाजन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज येथील प्रसिध्द छायाचित्रकार तुषार मानकर यांची सर्वानेमते निवड करण्यात आली आहे निवड झाल्या बद्दल चेअरमन ज्ञानेश्वर महाजन सदस्य डी एन महाजन,विनोद तायडे,भागवत चौधरी,सुधाकर महाजन,रविंद्र महाजन,सौ शकुंतलाबाई महाजन,सौ छायाबाई महाजन,देविदास महाजन,कैलास वाणी,रामदास महाजन,मुरलीधर महाजन,संतोष पाटील, आदिंनी अभिनंदन केले.