July 8, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोना जात – पात -धर्म च्या पलीकडे , मुस्लिम मनियार बिरदारिस जळगाव करांचा सुखद अनुभव

रावेर (शरीफ शेख)

जळगाव- २६ मार्च पासून जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी ही जळगाव शहरात व आसपासच्या ग्रामीण विभागात धान्य वाटप करीत आहे प्रथम दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, तीन किलो तुरदाळ, दोन किलो तेल हे धान्य पुरविले परंतु २ एप्रिल पासून पाच किलो गहू ,पाच किलो तांदूळ दोन किलो तूर डाळ ,एक किलो तेल व पाव किलो चटणी अशाप्रकारे देण्यात येत आहे.

कोरोना मुळे सध्या बातम्या व सोशल मीडियाद्वारे जात-पात व धर्म मध्ये हा आजार वाटला जात असताना जळगावात मात्र मुस्लिम मनियार बिरादरी ला सुखद अनुभव येत आहे.
● आमच्या एका मित्राने प्रेम नगर मधील आदित्य आपारमेंट मधील कुलकर्णी कुटुंबियांना धान्याची आवश्यकता असल्याचे बोलताच आम्ही त्या ठिकाणी गेलो व त्यांना धान्य दिले तेव्हा त्यांनी आमच्यासोबत जी वागणूक दिली ती आम्हाला सुखद धक्का देणारी होती.
●त्याप्रमाणे सामाजिक कार्यकरती वैशाली झालटे हिने सुद्धा विनंती केली असता तिच्याकडे धान्य घेऊन पोहोचलो असता उपस्थित बत्तीस महिला यांनी आम्हास जेव्हा भाऊ-दादा म्हणून हाक मारली असता आम्ही त्यांचे बंधु म्हणून त्यांची काही अंशी पूर्तता केली तेव्हा आम्हास धन्य वाटले कारण त्या ३२ पैकी ३० भगिनी ह्या आमच्या हिंदू समाजाच्या होत्या.
● उपजिल्हाधिकारी शरद मते साहेब ,दीपमाला चौरे मॅडम व वाघ साहेबांनी एक सामाजिक कार्यकर्त्यांचा ग्रुप बनविला असून त्या माध्यमाने ते त्यांच्याकडे आलेल्या मागणीनुसार सामाजिक संघटनेस काम सोपवतात त्यानुसार शिव कॉलोनी होटेल चीनार च्या मागे शुभांगी बराठे व उपासनी नगर मधील उद्धव वायकोळे ,सुप्रीम कालनी मधील विकास राठोड व अशोक राठोड, नाथ वाड्यातील आर जी तडवी यांच्या कडे धान्य घेऊन गेलो असता त्यांच्या पैकी दोन व्यक्ती पूर्णपणे आंधळे होत्या त्यांनी दिलेली दुवा व आशीर्वाद आम्ही आयुष्यभर विसरणार नाही तर सुप्रीम कॉलनी मधील राठौड़ बंधू यांनी आपल्या डोळ्यात अश्रू आणून आम्हाला फक्त आपल्या भावना कळवील्या..
●असेच आमचे एक माध्यम मध्ये कार्यरत असलेले मित्राचा मेसेज आला की खोटे नगर मधील इंद्र पवार यांना धान्याची आवश्यकता आहे आम्ही रात्री दहा वाजता खोटे नगर मध्ये पोहोचलो असता त्यांनी धान्य घेतात आपल्या डोळ्यातील अश्रू ला वाट करून दिली व आपण एवढ्या रात्री येऊन मला घरपोच मदत केली मी आपले ऋण आयुष्यभर विसरणार नाही एवढ्यावरच ते थांबले नाही तर काही लोक या आजाराला सुद्धा धर्मांमध्ये वाटप करीत आहे. अशा लोकांनी येऊन बघावे मुस्लिम मनियार बिरादरी ही कशाप्रकारे आपल्या समाजा सह हिंदू बंधू आणि भगिनीना सहकार्य कारित आहे.

अशा लोकांच्या आशीर्वाद व दुवा मुळे जळगाव मुस्लिम मन्यार बिरादरी ला एक वेगळी ऊर्जा मिळाली व छाती सुद्धा फुलुन आली की अद्याप आमच्या जळगावात माणूसकी व मानव धर्म जिवंत आहे.

आमच्या आवाहनास यांनीसुद्धा तिला प्रतिसाद

जेव्हा बिरादरी कडे काही प्रमाणात धान्यची अडचण निर्माण झाली तेव्हा अशोकभाऊ जैन, चंद्रकांत जैन, कांचन चौधरी, विवेक आळवणी ,डॉक्टर प्रभा बडगुजर, सह मुफ़्ती अतिकुरहमान, अन्वर सिकलिगर, अयाज बागवान, भुसावळचे मुकीम अंडेवाले धावून आले व त्यांनी आम्हाला धान्य रुपी मदत केलेली आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!