May 30, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यवतमाल का राजा चे विविध सामाज उपयोगी उपक्रम प्रेरणादायी

यवतमाळ – मागील 57 वर्षापासून यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ आपल्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नवलौकिक असून कोरोना वायरस या महामारी पासून यवतमाळकरांचे बचाव व्हावे या दृष्टीकोनाने 15 मार्च पासून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश व साबनचे यवतमाळ शहरातील चौक चौकात महावितरण करुन जवळपास 30 हजार लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविली. लॉकडाऊन अंतर्गत मागील अनेक दिवसापासून यवतमाळ शहरातील गरजू तसेच मजूर अपंग व्यक्तींना धान्य व किराणाची किट घरपोच पोहोचविण्याचा उपक्रम यवतमाल का राजा चमू ने केली असून 10 हजार कुटूंबियांपर्यंत ही किट पोहोविण्याचे लक्ष असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी सांगितले. यवतमाल का राजा चमुच्या माध्यमातून सेवाभावी पोलीस बांधव आणि आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयामध्ये चहा पानी नास्ता व्यवस्था नियमितपणे सुरु असून प्राणी मात्रांवरती सुद्धा यवतमाल का राजा चमुने लक्ष ठेवून मुक जनावर, पशु पक्षींसाठी दाना, हिरवा चारा तसेच रोटीची व्यवस्था नियमितपणे केली असून 31 मार्च पासून यवतमाल का राजा नवयुवक गणेश मंडळ यवतमाळने चार चाकी गाडी ङ्गवारणीसाठी उपलब्ध करुन यवतमाळ शहरात सॅनिटाय करण्याच्या संकल्पनेतून प्रयासत आहे. यात नगर परिषद यवतमाळचे मुख्याधिकारी यांनी औषध उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्विकारली असून यवतमाळ शहराच्या काना कोपर्‍यात यवतमाल का राजा चमुचे सदस्य अहोरात्र परिश्रम घेऊन ङ्गवारणी करीत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आज पर्यंत जवळपास 5200 अन्न धान्याचे किटचे वितरण संपन्न झाले असून या उपक्रमाकरिता यवतमाळ शहरातील नागरिकांचे सहकार्य लाभत असल्याचे यवतमाल का राजा व नवयुवक गणेश मंडळ असून या उपक्रमाकरिता यवतमाळ शहरातील नागरिकांचे सहकार्य लाभत असल्याचे यवतमाल का राजा व नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी सांगितले. दरम्यान विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती व आमदार रवि राणा यांनी सुद्धा यवतमाल का राजा यांच्या विविध समाजपयोगी कार्याची दखल घेऊन यवतमाल का राजा चे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून मुक्तकंठाने प्रशंसा करुन सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!