May 30, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

जे.जे.तील कोविद १९ चाचणी केंद्राची तयारी पूर्ण सोशल डिस्टन्स आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

राजेश भांगे

मुंबई – कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्राची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी सोशल डिस्टन्स आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे.
भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविड-१९ या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला १५० चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता १००० पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्राची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी श्री. देशमुख यांनी केली.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!